बुद्ध धम्म हा जगाला शांतीचा संदेश देणारा धम्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:17 IST2021-07-26T04:17:25+5:302021-07-26T04:17:25+5:30
परभणी : बुद्ध धम्म हा जगाला शांतीचा संदेश देणारा महान धम्म आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ...

बुद्ध धम्म हा जगाला शांतीचा संदेश देणारा धम्म
परभणी : बुद्ध धम्म हा जगाला शांतीचा संदेश देणारा महान धम्म आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले.
सुजातानगर येथील बुद्ध विहारात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते वर्षावास कार्यक्रमास प्रारंभ झाला. याप्रसंगी रिपाइंचे राज्य सचिव डी.एन. दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर म्हणाले, शांती, शील, साधना असे महान विचार भगवान गौतम बुद्धांनी जगाला दिले आहेत. बुद्ध धम्म हा जगाला शांतीचा संदेश देणारा जागतिक महान धम्म म्हणून ओळखला जातो, असे ते म्हणाले. सुजातानगर येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या वाचनाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी सुजाता महिला मंडळ व उपासक यांच्या वतीने बुद्ध वंदना घेण्यात आली. बौद्धाचार्य भानुदास साबळे यांनी प्रास्ताविक केले. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष भगवान जगताप, गौतम मुंडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचा सत्कार करण्यात आला. रिपाइंचे डी.एन. दाभाडे यांचाही सत्कार जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रेखाताई रगडे, सुनीता जगताप, नंदा मुंडे, गयाबाई झिंजाडे, मंगलाताई भक्ते, सविता रोडे, दीपाली प्रधान, लता तालेवार, रामराम तालेवार, डी.आर. तुपसुंदर, भगवान जगताप, बाबुराव सरोदे, भीमराव प्रधान, एन.जी. गायकवाड, अरविंद भक्ते, अशोक जोंधळे, अरूण गायकवाड, गौतम सुतारे, अक्षय जगताप, सचिन मुंडे, प्रवीण वाघमारे, शुभम तालेवार आदींनी प्रयत्न केले.