ऑनलाइनवरुन त्यांना लाईनवर आणले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
By ज्ञानेश्वर भाले | Updated: August 27, 2023 15:18 IST2023-08-27T15:18:32+5:302023-08-27T15:18:41+5:30
परभणीतील कृषी विद्यापीठात रविवारी झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे बोलत होते.

ऑनलाइनवरुन त्यांना लाईनवर आणले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
परभणी : महाविकास आघाडी सरकारच्या काळात कायम घरात बसून राज्याचा कारभार ऑनलाईनवर पाहणाऱ्यांना आम्ही लाईनवर आणण्याचे काम केले. त्यांना असा झटका आमच्या माध्यमातून बळाला की ते थेट लाइनरवरच आल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली. परभणीतील कृषी विद्यापीठात रविवारी झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते.
गतकाळात ऑनलाईन कारभारावर भर देणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्र्यामुळे विकास कामांना ब्रेक लागला होता. पण आम्ही त्यांना असा करंट दिला की ते थेट ऑनलाइनवरून लाईनवरच आल्याची स्थिती आहे. आम्ही भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर हे सरकार पडणार अशा बतावण्या त्यांच्या माध्यमातून सातत्याने झाल्या. परंतु ते शक्य झाले नसल्याने आता मुख्यमंत्री बदलणारा असे वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून विरोधक करत आहे. त्यामुळे या भूलथापांना बळी न पडता नागरिकांनी विकास कामे करणाऱ्या या महायुतीच्या सरकारला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले.
सरकार पडणार, मुख्यमंत्री बदलणार, असे बोलले जात असले तरी आता तशी शक्यता आता तर नाहीच. कारण अजित पवारांचा भक्कम पाठिंबा मिळाल्यामुळे आता महायुती अधिक सक्षम झाली. त्याचा परिणाम आगामी काळात सुद्धा दिसून येईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यादरम्यान शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आठ लाख ७४ हजार लाभार्थ्यांना १ हजार ४४६ कोटीचा लाभ देण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह जिल्ह्यातील आमदार यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.