दारुड्या पित्याला मुलाने संपविले
By Admin | Updated: November 5, 2014 13:43 IST2014-11-05T13:43:29+5:302014-11-05T13:43:29+5:30
दारु पिवून सतत त्रास देणार्या पित्याला कुर्हाडीचे घाव मानेवर घालून मुलाने संपविल्याची घटना शेवडी बाजीराव येथे १ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३0 च्या दरम्यान घडली.

दारुड्या पित्याला मुलाने संपविले
शेवडी बाजीराव : दारु पिवून सतत त्रास देणार्या पित्याला कुर्हाडीचे घाव मानेवर घालून मुलाने संपविल्याची घटना शेवडी बाजीराव येथे १ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३0 च्या दरम्यान घडली.
माणिक शंकर लुटे (वय ५५) असे मयताचे नाव आहे. आरोपी शंकर माणिक लुटे हा मयताचा मुलगा. यातील माणिक लुटे यांना दारु पिण्याचे व्यसन होते. दारुच्या नशेत नेहमी ते मुलगा शंकर यांच्याकडे पैशाची मागणी करीत होते. या कारणावरुन दोघा पिता- पुत्रात भांडणेही होत. १ नोव्हेंबर रोजी रात्री उपरोक्त कारणावरुन पिता-पुत्रात भांडण झाले, यावेळी आरोपीने घरातील कुर्हाड उचलून पित्याच्या मानेवर घातली आणि त्याला कायमचेच संपविले.
सकाळी ही घटना सोनखेड पोलिसापर्यंत पोहोचली. जमादार दासराव भुत्ते यांनी घटनास्थळी भेट देवून पंचानामा केला. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. तपास सोनखेडचे सपोनि धुóो करीत आहेत./(वार्ताहर)