पेढ्यातून दोघांना दिले गुंगीचे औषध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST2021-06-10T04:13:24+5:302021-06-10T04:13:24+5:30
जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील ओंकार डिगांबर बुधवंत हा तरुण ५ रोजी दुपारी १ च्या सुमारास जिंतूर येथील हॉटेल रसिका ...

पेढ्यातून दोघांना दिले गुंगीचे औषध
जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील ओंकार डिगांबर बुधवंत हा तरुण ५ रोजी दुपारी १ च्या सुमारास जिंतूर येथील हॉटेल रसिका येते आला. त्याने येथील कुक म्हणून काम करणाऱ्या त्याच्या ओळखीच्या जगदीश रतन पाईकराव आणि करीम सय्यद अहेमद यांना औंढा येथून प्रसाद आणला आहे म्हणून २५० ग्रॅम पेढ्याचा बॉक्स दिला. यावेळी त्यांनी ओंकार याला पेढा खाण्यास सांगितले असता अंघोळ करून पेढा खातो, असे म्हणून तो निघून गेला. त्यामधील पेढे जगदीश पाईकराव व करीम सय्यद यांनी खाल्ले. त्यानंतर काही वेळाने ते दोघेही बेशुद्ध झाले. यावेळी उपचारासाठी दोघांनाही सय्यद करीम याच्या मोठ्या भावाने जिंतूर येथील दवाखान्यात दाखल केले. तेथून त्यांना परभणी येथे हलविण्यात आले. ६ जून रोजी दुपारी १ वाजता हे दोघेही शुद्धीवर आले. त्यानंतर त्यांनी उपचार घेऊन ८ जून रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी ओंकार डिगांबर बुधवंत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.