अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:17 IST2020-12-22T04:17:29+5:302020-12-22T04:17:29+5:30

पाथरी तालुक्यातील पाटोदा येथील अनिल साहेबराव ढवळे (वय ३५) व सूर्यकांत आगळे( वय २२) असे अपघात मयत झालेल्या तरुणांची ...

Both died in an unidentified vehicle collision | अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

पाथरी तालुक्यातील पाटोदा येथील अनिल साहेबराव ढवळे (वय ३५) व सूर्यकांत आगळे( वय २२) असे अपघात मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत .हे दोघेही गोपेगाव येथे पाहुण्यांच्या घरी वाढदिवसाला गेल्यानंतर घरी परतत होते .२० डिसेंबर रोजी रात्री १०.०० ते १०.३० वाजेच्या सुमारास गोपेगाव- पाटोदा रस्त्याने जात असताना त्यांच्या एमएच २२ डी. ११३८ क्रमांकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली .घटनेनंतर काही वेळाने याठिकाणी आलेल्या व्यक्तींनी जखमी अवस्थेत असलेल्या या दोन्ही तरुणांना मानवत येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले होते. यानंतर मानवत येथील शासकीय दवाखान्यात डॉक्टरांनी दोन्ही तरुणांना मृत घोषित केले .अपघाताचे नेमके कारण कळू शकलेले नसून २१ डिसेंबर रोजी सकाळी दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले .घटनास्थळी पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन सैदाने ,पोह विठ्ठल करे ,पोह रामा हातागळे यांच्या पथकाने भेट देत पंचनामा केला आहे .या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत फिर्याद दाखल झाली नव्हती.

Web Title: Both died in an unidentified vehicle collision