The body of a young man from Yeldari was found near Charthana | येलदरीतील तरुणाचा चारठाण्याजवळ मृतदेह सापडला

येलदरीतील तरुणाचा चारठाण्याजवळ मृतदेह सापडला

चारठाणा येथून हाकेच्या अंतरावर शेताकडे जात असलेल्या महिलांना सकाळी दुर्गंधी आली. त्यामुळे आजूबाजूला त्यांनी शोध घेतला असता रस्त्याच्या बाजूला एका खड्ड्यात (एमएच २० बीए २७९०) या क्रमांकाची दुचाकी व कुजलेल्या अवस्थेत एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही माहिती महिलांनी पोलिसांना दिली. त्यानंतर जितूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रवण दत्त, चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत जमादार, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप अल्लापुरकर यांनी घटनास्थळ भेट देऊन मृतदेहाचा पंचनामा केला. चौकशीअंती मृत तरुणाची ओळख पटली. त्यानुसार हा तरूण येलदरी येथील संघपाल भगवान वाकळे असल्याचे समोर आले. संघपाल हा १४ जानेवारीला औरंगाबाद येथून मतदानासाठी गावी येत होता. तो येलदरीला पोहोचलाच नसल्याने नातेवाईकांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सात दिवसांनंतर चारठाण्याजवळ कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणाचा अपघाताती मृत्यू झाला किंवा काही घातपात झाला, याविषयी घटनास्थळी उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, मृत तरुणाचे तेथेच शवविच्छेदन करून जागेवरच अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: The body of a young man from Yeldari was found near Charthana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.