बेपत्ता मुलीचा आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:15 IST2021-01-18T04:15:46+5:302021-01-18T04:15:46+5:30

करंजी येथील प्रज्ञा सुभाष ढगे (१६) ही मुलगी १५ जानेवारी रोजी सायंकाळपासून बेपत्ता होती. तिचे वडील ...

The body of a missing girl was found | बेपत्ता मुलीचा आढळला मृतदेह

बेपत्ता मुलीचा आढळला मृतदेह

करंजी येथील प्रज्ञा सुभाष ढगे (१६) ही मुलगी १५ जानेवारी रोजी सायंकाळपासून बेपत्ता होती. तिचे वडील सुभाष बाबाराव ढगे यांनी मानवत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची तक्रारीत म्हटले होते. हे कुटुंबिय मुलीचा शोध घेत असताना १७ जानेवारी सकाळी ८ वाजता करंजी शिवारातील शेतातील विहिरीत प्रज्ञा सुभाष ढगे हिचा मृतदेह आढळला. पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, जमादार प्रताप साळवने, निलेश परसोडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. लक्षमण ढगे यांच्या माहितीवरून मानवत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मुलीच्या कुटुंबीयांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याने व विहिरीत मृतदेह अढळून आल्याने प्रकरणाचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसासमोर आहे. प्राथामिक तपासात ही आत्महत्या असल्याचे दिसून येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The body of a missing girl was found