न्यायालय परिसरात रक्तदान शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST2021-04-16T04:16:24+5:302021-04-16T04:16:24+5:30
महाराष्ट्र अर्बन सोसायटी येथील महाराष्ट्र अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या वतीने १४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता येथील अण्णा भाऊ ...

न्यायालय परिसरात रक्तदान शिबीर
महाराष्ट्र अर्बन सोसायटी
येथील महाराष्ट्र अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या वतीने १४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विश्वनाथ गवारे, सुधीर इंगळे, बालाजी साठे, मुगाजी बुरुड, अशोक गवारे, दादाराव शिवभगत, कचरोबा बुरुड, सिद्धार्थ जाधव, अजय जाधव आदींची उपस्थिती होती.
भीमनगर येथे ध्वजारोहण
भीमनगर येथे आ. डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डॉ. विवेक नावंदर, नगरसेवक सुशील कांबळे, सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, पोलीस निरीक्षक धुमाळ, एन. एस. सरोदे, अमोल गायकवाड, माधवराव हतागळे, अविनाश अवचार, राणूबाई वायवळ, सुशीलाबाई निसर्गंध, अमोल भालेराव, मोती शिंदे, राहुल कांबळे, पंडित निकाळजे, सतीश वाकळे, स्वरूप गाढे, अजय रसाळ, यशवंत खाडे, निखिल जैन, मनोहर सावंत, बाबूराव पंडित, किरण काळे आदींची उपस्थिती होती.
आंबेडकरनगर, परभणी
येयील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात जयंतीनिमित्त लसीकरण शिबीर घेण्यात आले. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी डॉ. प्रकाश डाके, डॉ.धुतमल, डॉ.किशोर सुरवसे, मिलिंद बामणीकर, कपिल बनसोडे, धीरज पाथरीकर, जयंती समितीचे अध्यक्ष रवी गाडे, विस्तार अधिकारी सुनील डोंगरदिवे, सतीश बनसोडे, मुकुंद नंद आदींची उपस्थिती होती.
कौशल्य भारत कार्यालय
येथील कौशल्य भारत कार्यालयात जयंती कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी संस्थाप्रमुख एस. व्ही. सूर्यवंशी, ए. सी. पांडे, आर. एस. ठोंबरे, ए. यू. काटकर, एस. एस. जोशी, अमजद, एन. एच. कांबळे आदींची उपस्थिती होती.