‘एहसास’च्या शिबिरात ५४ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST2021-04-13T04:16:22+5:302021-04-13T04:16:22+5:30
राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, विविध अपघातांत गंभीर जखमी, प्रसूतीदरम्यान, शस्त्रक्रियासाठी, तसेच थॅलेसिमियाग्रस्त बालकांना नेहमीच रक्ताची गरज भासते. ...

‘एहसास’च्या शिबिरात ५४ जणांचे रक्तदान
राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, विविध अपघातांत गंभीर जखमी, प्रसूतीदरम्यान, शस्त्रक्रियासाठी, तसेच थॅलेसिमियाग्रस्त बालकांना नेहमीच रक्ताची गरज भासते. मानवी रक्ताला पर्याय नसल्याने ही गरज मानवी शरीरातून रक्तदान करून भागवावी लागते. सध्या कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी शहरातील एहसास जिंदगी ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी रक्तदान करून इतरांचे प्राण वाचवावेत. रक्तदान श्रेष्ठदान आहे. प्रत्येकाने दर सहा महिन्याला रक्तदान करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ.डॉ.राहुल पाटील यांनी केले. यावेळी उपमहापौर भगवान वाघमारे, तुराब खान, मो.अब्दुल बाखी, पत्रकार मोईन खान, नगरसेवक इमरान हुसैनी, नगरसेवक महेमुद खान, मोहम्मद अझहर, इमरान खान, जावेद खान, रहेमान खान, अक्रम सिद्दीकी, शेख वसीम, अब्दुल खदीर आदी उपस्थित होते. यशस्वितेसाठी आयोजक कामरान खान, पत्रकार सय्यद सगीर, शेख ताहेर, लईख अन्सारी, अझहर खान, समी सौदागर, मसुद खान, अरबाज खान, रफीयोद्दीन,आमेर खान यांच्यासह परभणी जिल्हा रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.