जिंतूर ग्रामीण रुग्णालयात ३४ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:17 IST2021-04-11T04:17:28+5:302021-04-11T04:17:28+5:30

कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तदान चळवळ राबविण्यासाठी काही जणांनी पुढाकार घेतला असून, त्यातून जिंतूर येथील ...

Blood donation of 34 people at Jintur Rural Hospital | जिंतूर ग्रामीण रुग्णालयात ३४ जणांचे रक्तदान

जिंतूर ग्रामीण रुग्णालयात ३४ जणांचे रक्तदान

कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तदान चळवळ राबविण्यासाठी काही जणांनी पुढाकार घेतला असून, त्यातून जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात ९ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ. कान्हाडकर, डॉ. भायकर, डॉ. अनिफ खान, डॉ. बामणे, विनोद राठोड, उबाळे, सुहास देशमुख आणि ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रत्येक महिन्यात २२ थॅलेसेमियाग्रस्त बालकांना रक्त दिले जाते; परंतु मागच्या काही दिवसांपासून रक्तदानाची चळवळ थांबल्याने थॅलेसेमियाग्रस्त बालकांसाठीच्या रक्ताचा प्रश्‍न निर्माण झाला होता. अजूनही पुरेसा रक्तसाठा उपलब्ध झालेला नाही. तेव्हा रक्ताची निर्माण झालेली कमतरता लक्षात घेता जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Blood donation of 34 people at Jintur Rural Hospital