महापालिकेच्या विरोधात नगरसेवकांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:23 IST2021-09-08T04:23:29+5:302021-09-08T04:23:29+5:30
यावर्षीच्या पावसाळ्यात शहरातील वसमत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून नागरिकांची तारांबळ उडत आहे. या भागातील नाल्यांतून पाणी वाहून जात ...

महापालिकेच्या विरोधात नगरसेवकांचा रास्ता रोको
यावर्षीच्या पावसाळ्यात शहरातील वसमत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून नागरिकांची तारांबळ उडत आहे. या भागातील नाल्यांतून पाणी वाहून जात नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. मनपा प्रशासनाने हा प्रश्न सोडविला नाही. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत संपूर्ण वसमत रस्ता पाण्याखाली गेला होता. मंगळवारीदेखील या रस्त्यावर तीन फुटांपर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे वसमत रस्त्यावरील अनेक वसाहतींमधील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. या मार्गावरील पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी वारंवार करण्यात आली; परंतु मनपाने कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवक तसेच नागरिकांनी मंगळवारी सायंकाळी या मार्गावर रास्ता रोको आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला. या आंदोलनात नगरसेविका मंगलताई मुदगलकर, नगरसेवक चंदू शिंदे, सचिन देशमुख, अक्षय देशमुख, विश्वजित बुधवंत व परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.