शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत गटविकास अधिकाऱ्यास भाजप तालुकाध्यक्षाची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 15:20 IST

शिवसेना आमदारांच्या उपस्थितीत आयोजित बैठक रद्द करण्याची मागणी

परभणी : शिवसेना आमदारांच्या उपस्थितीत आयोजित बैठक रद्द का करत नाहीत़ या कारणावरून येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना भाजप तालुका अध्यक्षाने मारहाण केल्याची घटना २३ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़ 

गटविकास अधिकारी चंद्रहार मारोती ढोकणे यांनी या संदर्भात नवा मोंढा पोलिसांकडे तक्रार दिली आहे़ त्यानुसार  २३ जानेवारी रोजी दुपारी १ ते रात्री ११ या या काळात ही घटना घडली़ बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत असताना भाजप तालुका अध्यक्ष राजेश देशमुख यांनी फोन करून  आमदार राहुल पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित पाणी टंचाई निवरणाची बैठक रद्द करा, असे सांगितले़ परंतु, तसे करता येणार नाही, असे मी त्यांना सांगितले.

त्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास शासकीय निवासस्थानामध्ये फाईली तपासणीचे काम करीत असताना राजेश देशमुख व इतर पाच जण निवासस्थानासमोर आले व फोन करून त्यांनी घराबाहेर बोलून घेतले़ यावेळी त्यानी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली़ तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे़ या तक्रारीवरून राजेश देशमुख यांच्यासह इतर पाच जणांविरूद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आणि मारहाण करण्याच्या कलमान्वये नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीBJPभाजपाblock development officerगटविकास अधिकारी