पीक विम्यासाठी भाजपची कृषी मंत्र्यांसमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST2021-05-31T04:14:32+5:302021-05-31T04:14:32+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचा तूर, सोयाबीन पीक विमा पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा, या प्रमुख मागणीसाठी आ. मेघना बोर्डीकर, भाजपाचे ...

पीक विम्यासाठी भाजपची कृषी मंत्र्यांसमोर निदर्शने
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचा तूर, सोयाबीन पीक विमा पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा, या प्रमुख मागणीसाठी आ. मेघना बोर्डीकर, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात काळ्या फिती लावून निदर्शने केली. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हा कचेरीत कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत बैठक सुरू होती. बाहेर सुरू असलेला गोंधळ पाहून कृषिमंत्री दादा भुसे बैठक सोडून बाहेर आले व त्यांनी आंदोलकांशी चर्चा करत निवेदन स्वीकारले. या आंदोलनात आ. मेघना बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उद्धव नाईक, रंगनाथ सोळंके, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भालेराव, बाळासाहेब जाधव, प्रमोद वाकोडकर, बालटकर, विनय कातकडे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली.