भाजपतर्फे अतिवृष्टीग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST2021-07-15T04:14:10+5:302021-07-15T04:14:10+5:30

परभणी शहरात ११ व १२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने विविध भागातील नागरिकांच्या घरात पाणी गेले होते. यात संसारोपयोगी साहित्याचे ...

BJP helps flood victims | भाजपतर्फे अतिवृष्टीग्रस्तांना मदत

भाजपतर्फे अतिवृष्टीग्रस्तांना मदत

परभणी शहरात ११ व १२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने विविध भागातील नागरिकांच्या घरात पाणी गेले होते. यात संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शिवाय पावसाच्या पाण्याने शहरातील कारेगाव रोडनजीक आशीर्वादनगर, दुर्गा माता मंदिर परिसरालगत पुलाच्या कामानिमित्त अडवलेल्या जायकवाडीच्या कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हे पाणी लगतच्या वसाहतीमधील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील जीवनाश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे या नागरिकांशी भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी संवाद साधला. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा उपजिल्हाध्यक्ष संजय कुलकर्णी, रितेश जैन, मंडळाध्यक्ष विजय दराडे, संदीप शिंदे, अतुल बर्गे आदी उपस्थित होते. यावेळी भरोसे यांनी या नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून प्रशासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

Web Title: BJP helps flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.