भुसार दुकान फोडून ४५ हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:16 IST2021-04-17T04:16:27+5:302021-04-17T04:16:27+5:30
मानवत तालुक्यातील हत्तलवाडी येथील बालकिशन लिंबाजी शिंदे यांचे मानवत येथे पाळोदी रोडवर भुसार मालाचे दुकान आहे. १२ एप्रिल रोजी ...

भुसार दुकान फोडून ४५ हजार लंपास
मानवत तालुक्यातील हत्तलवाडी येथील बालकिशन लिंबाजी शिंदे यांचे मानवत येथे पाळोदी रोडवर भुसार मालाचे दुकान आहे. १२ एप्रिल रोजी त्यांनी दिवसभर व्यवसाय करून सायंकाळी ७ वाजता दुकान बंद केले. त्यानंतर ते गावी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून दुकानाच्या काऊंटरमध्ये ठेवलेले ४५ हजार रुपये लंपास केले. १३ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता त्यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी दुकानात येऊन पाहिले असता चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आतील साहित्य अस्ताव्यत फेकून दिले होते. तसेच गल्ल्यातील ४५ हजार रुपये लंपास केले. याबाबत मानवत पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.