पूर्णेत भूमिपूजन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:18 IST2021-02-16T04:18:50+5:302021-02-16T04:18:50+5:30

पूर्णा : नगरपालिका प्रशासनाकडून उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम १४ फेब्रुवारी रोजी पार ...

Bhumipujan program in full | पूर्णेत भूमिपूजन कार्यक्रम

पूर्णेत भूमिपूजन कार्यक्रम

पूर्णा : नगरपालिका प्रशासनाकडून उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम १४ फेब्रुवारी रोजी पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो, भन्ते पैय्यावंश तर उद्‌घाटक म्हणून खासदार संजय जाधव, आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह अतुल सरोदे, संतोष एकलारे, उत्तम खंदारे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष राठोड, पोलीस निरीक्षक भोगाजी चोरमले, हाजी कुरेशी, नितीन कदम, शाम कदम, सुधाकर खराटे, विक्रम कदम, अनिल खर्गखराटे, ॲड. हर्षवर्धन गायकवाड, ॲड. राजेश भालेराव, ॲड. धम्मदीप जोंधळे, मुंजा कदम, मुकुंद भोळे, विरेश कसबे, बालाजी कदम, बालाजी शिरगोळे उपस्थित होते. उत्तम खंदारे यांनी प्रास्ताविक केले. दादाराव पंडित यांनी सूत्रसंचालन केले तर ॲड. हर्षवर्धन गायकवाड यांनी आभार मानले.

Web Title: Bhumipujan program in full