सव्वाचार कोटी रुपये खर्चाच्या जुना पेडगाव रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST2021-06-21T04:13:59+5:302021-06-21T04:13:59+5:30

आ. डॉ. राहुल पाटील यांनी मूलभूत सुविधा ठोस निधीअंतर्गत या रस्त्यासाठी ४ कोटी ११ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून ...

Bhumipujan of old Pedgaon road work costing Rs | सव्वाचार कोटी रुपये खर्चाच्या जुना पेडगाव रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

सव्वाचार कोटी रुपये खर्चाच्या जुना पेडगाव रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

आ. डॉ. राहुल पाटील यांनी मूलभूत सुविधा ठोस निधीअंतर्गत या रस्त्यासाठी ४ कोटी ११ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून रस्त्याचे काम होत आहे. रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमास खा. बंडू जाधव, आ. डॉ. राहुल पाटील, आ. सुरेश वरपुडकर, उपमहापौर भगवान वाघमारे, माजी सभापती रवींद्र सोनकांबळे, गटनेते जाकेर लाला, डॉ. विवेक नावंदर, मनपातील विरोधी पक्षनेते विजय जामकर, अतुल सरोदे, प्रशास ठाकूर, नंदू पाटील, राजू कापसे, बाळासाहेब बुलबुले, संजय खिल्लारे, बाळासाहेब दुधगावकर, प्रा. पंढरीनाथ धोंडगे, मनोज पवार, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, सुशील कांबळे, विवेक कलमे, अर्जुन सामाले, संजय गडग, मोबीन काजी आदींची उपस्थिती होती.

शहरातील विविध भागातील विकास कामांसाठी निधी आणला जात आहे. उर्वरित भागातही निधी आणून शहराचा विकास करणार असल्याचे आ. डॉ. राहुल पाटील यांनी यावेळी सांगितले. जुना पेडगाव रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांच्यावतीने आ .डॉ. राहुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वितेसाठी बाळासाहेब बुलबुले, बाळासाहेब दुधगावकर, डॉ. संजय खिल्लारे, मोबीन काजी, महापालिकेचे अभियंता बंडे, उमराव जाधव आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Bhumipujan of old Pedgaon road work costing Rs