शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचे विजय भांबळेंचे ठरलेय, बाबाजानी दुर्राणीं वेटिंगवरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 12:55 IST

या सर्व घडामोडींमध्ये माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांचा पक्षप्रवेश मात्र अजूनही लटकलेलाच आहे.

परभणी : जिल्ह्यातील काही दिग्गज आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षांतर करणार असल्याच्या वावड्या उठत होत्या. अखेर जिंतूरचे माजी आ. विजय भांबळे यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. मात्र, त्यांच्या आधीपासून चर्चेत असलेले पाथरीचे माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांचा प्रवेश लटकलेलाच आहे.

परभणी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आ. राजेश विटेकर हे जिल्हाध्यक्ष या नात्याने व्यक्तिश: लक्ष घालून जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. त्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील विविध भागांत जि.प., पं.स. व न.प.च्या दृष्टीने दिग्गजांना पक्षात प्रवेश दिला. आता जिंतूर विधानसभेत आणखी एका दिग्गजाचा प्रवेश होणार आहे. यापूर्वीच वंचितकडून लढलेले सुरेश नागरे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला आहे. त्यांच्यासोबत काही माजी जि.प.सदस्य आले आहेत. आता माजी आ. विजय भांबळे हे १ जुलै रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भांबळे यांच्यासमवेत जि.प.तील काही माजी पदाधिकाऱ्यांसह जि.प. सदस्य, नगरसेवक पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

अजित पवारांनी ऐनवेळी गुगलीया सर्व घडामोडींमध्ये माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांचा पक्षप्रवेश मात्र अजूनही लटकलेलाच आहे. दुर्राणी यांनीच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर करून उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाथरी दौऱ्यावर येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, हा कार्यक्रम झालाच नाही. पक्षांतराच्या रांगेत दुर्राणीही असून त्यांचा नंबर कधी येणार, हे कळायला मार्ग नाही. अजित पवारांनी ऐनवेळी गुगली टाकत कार्यक्रम रद्द केल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारparabhaniपरभणी