विश्व हिंदू परिषद, वारकरी संप्रदाय तर्फे भजन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:49+5:302021-07-18T04:13:49+5:30
ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना व जागोजागी अडवणूक केलेल्या सर्व वारकऱ्यांना सन्मानपूर्वक मुक्त करावे, त्यांच्यावर लावलेले सर्व गुन्हे तत्काळ ...

विश्व हिंदू परिषद, वारकरी संप्रदाय तर्फे भजन आंदोलन
ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना व जागोजागी अडवणूक केलेल्या सर्व वारकऱ्यांना सन्मानपूर्वक मुक्त करावे, त्यांच्यावर लावलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, आषाढी एकादशी पासून राज्यात विविध मठांमध्ये चालणारे चातुर्मास सेवा व मंदिरातील पारंपरिक उत्सव, सप्ताह, कीर्तन, प्रवचने, दर्शनासाठीचे प्रतिबंध दूर करावेत. सरकारने वारकरी वर्गाच्या मागण्या संदर्भात निर्णय न घेतल्यास येत्या काळात राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांतमंत्री अनंत पांडे, बजरंग दलाचे प्रांत संयोजक शिवप्रसाद कोरे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री सुनील रामपूरकर, महानगराध्यक्ष राजकुमार भांबरे, तुकाराम दैठणकर, गणेश काळबांडे, प्रसाद कुलकर्णी, मनीष देशपांडे, बापूराव सूर्यवंशी, भगवान पुरी, प्रदीप मुळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाला निवेदन दिले.