घरकुल योजनेचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:17 IST2021-03-06T04:17:03+5:302021-03-06T04:17:03+5:30

जिल्हा प्रशासनाला निवेदन परभणी : महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटविल्याने उदरनिर्वाह कसा करायचा, या विंवचनेतून लक्ष्मण सटवाजी कांबळे यांचा हृदयविकाराने ...

Benefit from Gharkul scheme | घरकुल योजनेचा लाभ द्या

घरकुल योजनेचा लाभ द्या

जिल्हा प्रशासनाला निवेदन

परभणी : महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटविल्याने उदरनिर्वाह कसा करायचा, या विंवचनेतून लक्ष्मण सटवाजी कांबळे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे राज्य शासनाने कांबळे कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शोभाबाई कांबळे, सत्यनारायण शर्मा, दिलीप वानखेडे, कपिल गायकवाड, नारायण धोंडगे, शुभम सुरजोशे, अब्दुल रहेमान, उस्मान खान, भारत चेऊलवार आदींनी केली आहे.

व्यवसायासाठी जागा द्या

परभणी : रजिस्ट्री ऑफिस व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात असलेली मोकळी जागा व्यवसायासाठी देण्यात यावी, अशी मागणी नारायण धोंगडे, दिलीप वानखेडे, अब्दुल रहेमान, उस्मान खान, भारत चेऊलवार, बालाजी दमकोंडे, शेख नईम आदींनी एका निवेदनाद्वारे पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे केली आहे.

महिला सरचिटणीसपदी छाया अंभोरे

परभणी : आदर्श ग्रामविकास फाउंडेशनच्या वतीने परभणी जिल्हा महिला सरचिटणीसपदी छाया अंभोरे, तर तालुकाप्रमुखपदी जयश्री पुंडगे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षा जयश्रीताई शुक्ला, लक्ष्मणराव सरवदे व जिल्हाध्यक्ष नीलेश राऊत यांच्या हस्ते अंभोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

अन्नसुरक्षा यादी रद्द करण्याची मागणी

परभणी : शहरात चावडीवाचन न करता अन्न सुरक्षा यादी मंजूर करण्यात आली आहे. ही यादी रद्द करून बीपीएल पात्र लाभार्थ्यांना पिवळ्या शिधापत्रिका देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावेत, अशी मागणी परमेश्वर जोंधळे, भगवान लंगोटे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

अजिंठानगर येथे जयंती कार्यक्रम

परभणी : शहरातील अजिंठानगर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उद्यान परिसरात लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीने फकिरा रानोजी साठे यांची १३६ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी दी.फ. लोंढे, कॉ. गणपत भिसे, उत्तम गोरे, हेमंत साळवे यांची उपस्थिती होती. अविनाश मोरे यांनी सूत्रसंचालन केले, तर एम.टी. तुरे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी वाय.टी. आवचार, जी.जी. गायकवाड, एम.एल. देवकांबळे, विजय खंडागळे, वामन आवचार, विक्की गोरे आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Benefit from Gharkul scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.