शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत बीएड सीईटीत ऐनवेळी शॉर्ट सर्किटने संगणक बंद; असुविधेने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By राजन मगरुळकर | Updated: March 27, 2026 13:26 IST

संगणकांची पूर्वतपासणी नाही अन् आसनव्यवस्थाही तोकडी; विद्यार्थी आक्रमक

परभणी: शहरातील एमआयडीसी भागातील एमजीएम महाविद्यालय येथील MAH-B.Ed CET-2026 परीक्षा केंद्रावर शुक्रवारी (दि. २७ मार्च) सकाळपासून प्रचंड गोंधळ उडाला आहे. या केंद्रावर संगणकांची पूर्वतपासणी न केल्याने आणि अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे अनेक संगणक बंद पडल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. परिणामी, परीक्षेसाठी आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागले असून, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शॉर्टसर्किट आणि अपुरी आसनव्यवस्थापरभणी शहरातील या एकमेव केंद्रावर दिवसभरात तीन ते चार सत्रांमध्ये सुमारे १३०० विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बोलावण्यात आले आहे. पहिल्या सत्रातील २९० विद्यार्थ्यांची परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार होती. मात्र, संगणक प्रणालीची तांत्रिक तपासणी न झाल्याने आणि वीजपुरवठ्यात बिघाड झाल्याने परीक्षेचा बोजवारा उडाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. सकाळी १० वाजेपासून केंद्रावर हजर असूनही त्यांना परीक्षेसाठी आत प्रवेश मिळण्यास अडचणी येत असल्याचे विद्यार्थी आणि महिला परीक्षार्थी यांनी सांगितले.

विविध संघटनांची मध्यस्थीपरीक्षेतील या गैरसोयीची माहिती मिळताच प्राध्यापक विठ्ठल कांगणे, नितीन देशमुख यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रावर धाव घेतली. त्यांनी विद्यार्थी आणि महाविद्यालय प्रशासनाशी संवाद साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असून, सीईटी सेलने या गोंधळाची जबाबदारी स्वीकारून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani B.Ed CET Disrupted by Short Circuit, Students Stranded.

Web Summary : A short circuit disrupted the B.Ed CET exam in Parbhani, leaving hundreds of students stranded. Technical issues and power outages plagued the exam center, causing delays and frustration. Various organizations intervened, demanding accountability from CET cell.
टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रparabhaniपरभणी