‘सुंदर माझे गाव’ या मोहिमेत व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:16 IST2021-02-15T04:16:24+5:302021-02-15T04:16:24+5:30
सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथे मुख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी १३ फेब्रुवारी रोजी ‘सुंदर माझे गाव’ या मोहिमेअंतर्गत देवगावफाटा येथे ...

‘सुंदर माझे गाव’ या मोहिमेत व्हावे
सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथे मुख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी १३ फेब्रुवारी रोजी ‘सुंदर माझे गाव’ या मोहिमेअंतर्गत देवगावफाटा येथे भेट दिली. याप्रंसगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, गटविकास अधिकारी विष्णु मोरे, गट शिक्षणाधिकारी गणराज यरमळ, सहायक बिडीओ डी. एस. अहिरे, महिला व बालविकास अधिकारी एस. बी. कच्छवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.. रावजी सोनवणे, अध्यक्ष बाबूआप्पा साळेगावकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख रामेश्वर बहिरट, भगवानराव सातपुते, रमेश महाराज मोरे, अमोल सातपुते, गोविंद मोरे यांची उपस्थिती होती. यावेळी सिईओ टाकसाळे यांनी आरोग्य उपकेंद्र आणि परिसरातील विकसित केलेल्या घनवन प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. येथील बहरलेले घनवन आणि येथे जनावरांना पिण्याचे पाण्यासाठी पाणवठा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी लक्ष्मण सोन्ने, विठ्ठल सातपुते, नागनाथ साळेगावकर, सखाराम चव्हाण यांचा सत्कार केला.