बँकेची कनेक्टिव्हिटी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:22 IST2020-12-30T04:22:58+5:302020-12-30T04:22:58+5:30

शालेय पोषण आहाराचे वाटप पोखर्णी : परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथील नृसिंह विद्या मंदिरात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे ...

Bank connectivity jammed | बँकेची कनेक्टिव्हिटी ठप्प

बँकेची कनेक्टिव्हिटी ठप्प

शालेय पोषण आहाराचे वाटप

पोखर्णी : परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथील नृसिंह विद्या मंदिरात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. पाचवी ते आठवीचे वर्ग कोरोना संसर्गामुळे बंद असल्याने विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत नाहीत. त्यांच्या नावे आलेला शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप केला जातो. विद्यार्थी व पालकांना संपर्क साधून त्यांना शालेय पोषण आहार घेऊन जाण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.

रस्ता दुरुस्तीची मागणी

पोखर्णी : पोखर्णीहून तरोडाकडे येणाऱ्या बोरवंड मार्गावरील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मागील दोन वर्षांत या रस्त्यावरून वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात होत आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी रस्ता उखडला आहे. रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने होत आहे.

‘परभणी - लातूर बसला थांबा द्या’

पोखर्णी : परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण आहे. याठिकाणी परभणी - लातूर या बसला थांबा नसल्याने अनेक प्रवाशांची अडचण होते. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी या बसला थांबा होता. मात्र, काही कारणास्तव पोखर्णी फाटा येथे असलेला थांबा रद्द केल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. एसटी महामंडळ प्रशासनाने या बसला पोखर्णी फाटा येथे थांबा द्यावा, अशी मागणी प्रवाशांच्या वतीने करण्यात येत आहे.

Web Title: Bank connectivity jammed