बॅडमिंटन स्पर्धेचा सेलूत समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST2021-02-05T06:05:36+5:302021-02-05T06:05:36+5:30

बॅडमिंटन दुहेरी क्रीडा स्पर्धेत अंतिम सामना डॉ.आवटे, खरात वि.पांचाळ, कदम यांच्यात अतितटीच्या लढतीत २:१ सेटमध्ये डॉ.आवटे, खरात जोडीने प्रथम ...

Badminton tournament concludes in Selut | बॅडमिंटन स्पर्धेचा सेलूत समारोप

बॅडमिंटन स्पर्धेचा सेलूत समारोप

बॅडमिंटन दुहेरी क्रीडा स्पर्धेत अंतिम सामना डॉ.आवटे, खरात वि.पांचाळ, कदम यांच्यात अतितटीच्या लढतीत २:१ सेटमध्ये डॉ.आवटे, खरात जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. दुसरे स्थान पांचाळ, कदम तर तिसऱ्या क्रमांकच्या सामन्यात पटेल, गुरुबाणी विरुद्ध माळवे, कडगे यांच्यात २:० सेटमध्ये झाला. पटेल, गुरुबाणी यांनी तिसरा क्रमांक प्राप्त केला, तर चौथ्या क्रमांकवर माळवे, कडगे यांनी यश प्राप्त केले.

बक्षीस वितरण परभणी जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सचिव रवींद्र देशमुख, डॉ.संजय रोडगे, डॉ.संजय हरबडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, मुख्याध्यापक अशोककुमार वानरे, अशोक कासार, उमेश गाडेकर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेस नूतन विद्यालय शिक्षण संस्था सरचिटणीस डी.के देशपांडे व सहसचिव डॉ.व्ही.के.कोठेकर यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक गिरीश लोडाया, सूत्रसंचालन डी.डी.सोन्नेकर तर आभार प्रदर्शन सतीश नावाडे यांनी केले.

स्पर्धा यशस्वितेसाठी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या मार्गदर्शन खाली रामकिशन मखमले, सतीश नावाडे, कुशल कडे, सुनील तोडकर, विशाल क्षीरसागर, सतीश जाधव, रमेश दौड, सचिन कोरडे, कैलास कापुरे, नितीन कापसे, केशव डाहळे, अरुण रामपुरकर यांनी परिश्रम घेतले. पंच म्हणून जितेंद्र घायतडक, सूरज शिंदे, राजेश राठोड यांनी काम पाहिले.

Web Title: Badminton tournament concludes in Selut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.