खराब पाण्याचा पुनर्वापर प्रकल्प परभणीत होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:14 IST2018-02-08T00:13:54+5:302018-02-08T00:14:41+5:30
येथील नेहरू पार्कमध्ये लवकरच सांडपाण्याचा पूनर्वापर करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे़ या प्रकल्पासाठी अमृत योजनेतून निधीही उपलब्ध झाला आहे़

खराब पाण्याचा पुनर्वापर प्रकल्प परभणीत होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील नेहरू पार्कमध्ये लवकरच सांडपाण्याचा पूनर्वापर करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे़ या प्रकल्पासाठी अमृत योजनेतून निधीही उपलब्ध झाला आहे़
परभणी शहरातील पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी महानगरपालिकेने वेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्लॅन तयार केला असून, गव्हाणे चौक भागात असलेल्या नेहरू गार्डनमध्ये हा प्रकल्प उभारण्याची तयारी करण्यात आली आहे़
नेहरू गार्डनच्या विकासासाठी अमृत योजनेतून १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, या अंतर्गत लँड स्केपिंग, लॉन टाकणे तसेच झाडे लावली जाणार आहेत़
उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन ही कामे थांबविण्यात आली असून, येत्या जून महिन्यात या कामांना प्रारंभ होईल, लँडस्केपिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर खराब पाण्याच्या पुनर्वापर प्रकल्पाचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली़ सध्या या प्रकल्पाचा आराखडा तयार करून घेतला जात आहे़