एटीएसने केले बॉम्ब शोधण्याचे प्रात्याक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST2021-07-20T04:14:00+5:302021-07-20T04:14:00+5:30
जिल्ह्यात मंगळवारी आषाढी एकादशी आणि बुधवारी बकरी ईदचा सण साजरा केला जात आहे. या काळात अनुचित प्रकार घडू नये, ...

एटीएसने केले बॉम्ब शोधण्याचे प्रात्याक्षिक
जिल्ह्यात मंगळवारी आषाढी एकादशी आणि बुधवारी बकरी ईदचा सण साजरा केला जात आहे. या काळात अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने खबरदारीचा उपाय म्हणून दहशतवाद विरोधी पथकाने सोमवारी सार्वजनिक ठिकाणी बॉम्ब शोधण्याचे प्रात्यक्षिक केले. शहरातील रेल्वेस्थानक आणि बसस्थानक परिसरातील पार्किंगची स्थळे, पार्सल विभाग आदी ठिकाणी अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने व प्रशिक्षित श्वानासह संयुक्तरीत्या ही मोहीम राबविण्यात आली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक के. बी. बोधगिरे, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले, सहायक उपनिरीक्षक शेख इब्राहिम, भारत नलावडे, अरुण कांबळे, सुधीर काळे, संतोष वाव्हळ, शिवाजी काळे, प्रवीण घोंगडे, शेख इम्रान, प्रेमदास राठोड, शेख शकील, श्वान ओरियन, बसस्थानकाचे आगार प्रमुख दयानंद पाटील आदी या मोहिमेत सहभागी झाले होते. सार्वजनिक ठिकाणी संशयित वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाला कळवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.