अल्पवयीन मुलीवर तिघांचा अत्याच्यार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:20 IST2021-09-21T04:20:26+5:302021-09-21T04:20:26+5:30

१४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी घराबाहेर येऊन उलट्या करत होती. उलट्या कशाने झाल्या, असे तिच्या ...

Atrocities of three on a minor girl | अल्पवयीन मुलीवर तिघांचा अत्याच्यार

अल्पवयीन मुलीवर तिघांचा अत्याच्यार

१४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी घराबाहेर येऊन उलट्या करत होती. उलट्या कशाने झाल्या, असे तिच्या आईने विचारले असता विष पिल्याचे पीडितीने आईला सांगितले. त्यानंतर पीडित मुलीला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तिला लातूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. १८ सप्टेंबर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पीडितीने तिच्यासोबत झालेली घटना तिच्या भावास सांगितली. १२ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान डिघोळ तांडा येथील पडक्या शाळेत बोलावून दोन अल्पवयीन मुलांसह तिघांनी अत्याचार केल्यामुळे विष पिल्याचे पीडितीने सांगितले.

याप्रकरणी पीडितेच्या मामाने दिलेल्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन आरोपी मुलांसह अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने हे तपास करीत आहेत.

Web Title: Atrocities of three on a minor girl