एटीएम फोडून साडेबारा हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST2021-02-05T06:07:31+5:302021-02-05T06:07:31+5:30
यासंदर्भात ईपीएस कंपनीचे चॅनल मॅनेजर अंकुश हुलेकर यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, शहरातील ...

एटीएम फोडून साडेबारा हजार लंपास
यासंदर्भात ईपीएस कंपनीचे चॅनल मॅनेजर अंकुश हुलेकर यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, शहरातील बँकांच्या एटीएमवर मोबाईल अॅप्लिकेशनव्दारे आपण देखरेख ठेवत असतो. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये एक कॉल दिसला. त्यात क्रांती चौकातील एटीएममध्ये कॅश हँडलर नावाचा एरर आला. त्यावरून एटीएममध्ये कॅश टाकणाऱ्या व्यक्तींना हा येरर पाठवला. त्यावेळी कर्मचारी आनंद बाळशंकर, विशाल बेंडे यांनी एटीएममध्ये जाऊन पाहिले असता मशीनला एरर असल्याचे सांगितले. त्यावेळी आपण तेथे जाऊन पाहिले असता एटीएम नादुरुस्त झाल्याचे दिसले. त्यामुळे एटीएममधील रक्कम मोजली. त्यावेळी आतील २१ लाख ३९ हजार रुपयांपैकी २१ लाख २६ हजार ५०० रुपये एवढी रक्कम एटीएममध्ये आढळली. १२ हजार ५०० रुपये कमी आढळले. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने क्रांती चौकातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून आतील १२ हजार ५०० रुपये रक्कम लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यावरून नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी केशवराज लटपटे करीत आहेत.