उधारी मागितल्याने बुक्कीने मारून दात पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:14 IST2021-06-25T04:14:31+5:302021-06-25T04:14:31+5:30

शहरातील सारनाथ कॉलनी भागातील बबन रामदेव पवार यांनी मुन्ना मिश्रा याला एक महिन्यापूर्वी ५० हजार रुपये उसने दिले होते. ...

Asking for a loan, Bookie gritted his teeth | उधारी मागितल्याने बुक्कीने मारून दात पाडले

उधारी मागितल्याने बुक्कीने मारून दात पाडले

शहरातील सारनाथ कॉलनी भागातील बबन रामदेव पवार यांनी मुन्ना मिश्रा याला एक महिन्यापूर्वी ५० हजार रुपये उसने दिले होते. २० जून रोजी रात्री ८ च्या सुमारास मुन्ना मिश्रा याने फोन करून बबन पवार यांना जिंतूर रोडवरील जगदंबा हॉटेल येथे ये, पैसे देतो म्हणून बोलावून घेतले. त्यानंतर पवार तेथे गेले व त्यांनी मुन्ना मिश्रा याच्याकडे उसने दिलेल्या पैशांची मागणी केली असता, त्याने तुझे पैसे देणार नाही, काय करायचे ते कर, म्हणून शिवीगाळ सुरू केली. शिवी देऊ नको, असे बबन पवार म्हणताच मुन्ना मिश्रा याने त्यांच्या तोंडावर जोरात बुक्की मारली. यात पवार यांचे ३ दात पडले. तसेच लाथाबुक्क्याने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या वेळी इतरांनी येऊन सोडवासोडव केली. याबाबत बबन पवार यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपी मुन्ना मिश्रा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Asking for a loan, Bookie gritted his teeth