रस्ते, नालीसह मुरुम टाकण्याच्या कामास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:18 AM2021-07-27T04:18:59+5:302021-07-27T04:18:59+5:30

परभणी : येथील महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शहरातील विविध भागात पेव्हर ब्लॉक रस्ते, नालीवरील स्लॅब या कामांसह एकूण १४ ...

Approval of road, drainage works | रस्ते, नालीसह मुरुम टाकण्याच्या कामास मंजुरी

रस्ते, नालीसह मुरुम टाकण्याच्या कामास मंजुरी

Next

परभणी : येथील महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शहरातील विविध भागात पेव्हर ब्लॉक रस्ते, नालीवरील स्लॅब या कामांसह एकूण १४ विषयांना मंजुरीे देण्यात आली.

२६ जुलैरोजी सकाळी ११ वाजता सभापती गुलमीर खान यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त प्रदीप जगताप, नगरसचिव विकास रत्नपारखे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेत एकूण १४ विषय एकमताने ठराव मान्य करण्यात आले. शहराच्या विकासासाठी रस्ते, नाल्या, पेवर ब्लॉक तसेच पॅचप बुजविणे, नालीवरचे स्लॅब टाकणे, शहरामधील ६५ प्रभागांमध्ये नवीन कॉलनीमध्ये मुरूम टाकणे आदी विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. नगरसेवक बाळासाहेब बुलबुले, अशोक डहाळे, नाजमीन पठाण, विजय ठाकूर आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

या कामांना दिली मंजुरी

प्रभाग ४ मध्ये पेव्हर रस्ता, प्रभाग १० मध्ये ‌ख्वाजा कॉलनी येथे मैदानाचे मजबुतीकरण, प्रभाग १२ मध्ये रस्त्याचे डांबरीकरण,

प्रभाग ४ मंगलमूर्ती नगर ते सोपानराव आवचार यांच्या घरापासून ते देऊळगावकर यांच्या घरापर्यंत तसेच आळसे यांच्या घरापासून ते लोखंडे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण, प्रभाग १५ माऊली नगरातील मोकळ्या मैदानापासून ते आंबेकर यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण तसेच रामकृष्णनगर, शंकरनगर, श्रीहरीनगर, बसवेश्‍वर महाराज चौक ते एमआयडीसीच्या पाण्याच्या टाकी आदी भागात रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. तसेच सुंदराईनगर येथे कॅनाॅलवरील पूल, सरकारी दवाखान्यासमोर नालीवर सुशोभिकरणास मंजुरी देण्यात आली.

मुरुम टाकण्यास मंजुरी

शहरातील विविध भागात खराब रस्त्यांवर मुरुम टाकण्यासही या सभेत मंजुरी देण्यात आली. पावसाने रस्ते खराब झाले असल्याने अधिक प्रमाणात मुरुम पुरवठा करण्यासही मान्यता देण्यात आली.

Web Title: Approval of road, drainage works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app