जिंतूर, सेलू, बोरी येथे ऑक्सिजननिर्मिती प्लांटला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:22 IST2021-04-30T04:22:16+5:302021-04-30T04:22:16+5:30

बोरी ग्रामीण रुग्णालयातील कोव्हिड केअर सेंटरला माजी आमदार विजय भांबळे यांनी भेट देऊन रुग्णांशी चर्चा केली. ग्रामीण रुग्णालय बोरी ...

Approval for Oxygen Generation Plant at Jintur, Selu, Bori | जिंतूर, सेलू, बोरी येथे ऑक्सिजननिर्मिती प्लांटला मंजुरी

जिंतूर, सेलू, बोरी येथे ऑक्सिजननिर्मिती प्लांटला मंजुरी

बोरी ग्रामीण रुग्णालयातील कोव्हिड केअर सेंटरला माजी आमदार विजय भांबळे यांनी भेट देऊन रुग्णांशी चर्चा केली.

ग्रामीण रुग्णालय बोरी येथे केअर सेंटर चालू केल्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शन येथेच उपलब्ध व्हावे व रुग्णाच्या नातेवाइकांची पळापळ होऊ नये यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासोबत चर्चा केली. याबाबतीत सकारात्मकता दाखवत रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन सिलिंडर, औषधे व साधने बोरी ग्रामीण रुग्णालयाला देण्यास आरोग्य विभागाने मान्यता दिली. बोरीसाठी दहा व जिंतूर, सेलू ग्रामीण रुग्णालय येथे प्रत्येकी २० जंबो ऑक्सिजन सिलिंडर गुरुवारी तत्काळ पाठविण्यात आले आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे अजय चौधरी, सभापती रामराव उबाळे, बोरी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

कोट

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक महिन्यांपूर्वी मतदारसंघातील रुग्णालयातील ऑक्सिजनची स्थिती सांगत प्लांट उभारण्यात यावा, अशी विनंती केली होती. ही मागणी त्यांनी मान्य करत जिंतूर येथे ५०, सेलूत ५० व बोरी येथे ३५ जंबो ऑक्सिजन सिलिंडरचा प्रतिदिन क्षमतेचे प्लांट मंजूर केले आहेत.

- विजय भांबळे, माजी आमदार

Web Title: Approval for Oxygen Generation Plant at Jintur, Selu, Bori