शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कामासाठी नियुक्ती अन् सीटीईटी परीक्षा एकाच दिवशी; शिक्षकांची झाली गोची

By मारोती जुंबडे | Updated: February 2, 2026 12:20 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षकांसाठी सीटीईटी परीक्षा देणे बंधनकारक असल्याने अनेक शिक्षकांनी निवडणूक कामातून मुक्तता देण्याची मागणी केली

परभणी : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान ७ फेब्रुवारी रोजी घेण्याची घोषणा केली आहे. मात्र याच दिवशी शिक्षकांसाठीची सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट परीक्षा असल्याने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ५ हजार २४० कर्मचाऱ्यांपैकी ३ हजार ३४१ शिक्षकांची मोठी गोची झाली आहे. परिणामी या शिक्षकांच्या जागी नव्याने कर्मचारी नियुक्त करून त्यांना प्रशिक्षण देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

परभणी जिल्ह्यातील ५४ जिल्हा परिषद सर्कल व १०८ पंचायत समिती गण यासाठी सुरुवातीला ५ फेब्रुवारी रोजी मतदान नियोजित होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमात बदल करत ७ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी असे नवे वेळापत्रक जाहीर केले. दरम्यान, मतदानाचा दिवस आणि सीटीईटी परीक्षा एकाच दिवशी आल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षकांसाठी सीटीईटी परीक्षा देणे बंधनकारक असल्याने अनेक शिक्षकांनी निवडणूक कामातून मुक्तता देण्याची मागणी करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी या शिक्षकांच्या जागी नव्याने कर्मचारी नियुक्त करून त्यांना प्रशिक्षण देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

नव्याने कर्मचाऱ्यांची नियुक्ती अन् प्रशिक्षणया पार्श्वभूमीवर, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून ज्या शिक्षकांची सीटीईटी परीक्षा आहे, त्यांच्या जागी नव्याने कर्मचारी नियुक्त करून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर पर्यायी मनुष्यबळ उभे करणे आणि प्रशिक्षण पूर्ण करणे हे प्रशासनासाठी आव्हान ठरणार असून, शिक्षकांची झालेली ही गोची सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

तालुकानिहाय शिक्षक नियुक्तीपरभणी १६७, मानवत ३८९, सेलू ६६६, पाथरी २३६, सोनपेठ ३८६, पूर्णा ८१८, गंगाखेड १७९ अशी एकूण ३,३४१ शिक्षकांची निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती.

५४ गट अन् १०८ गणांसाठी निवडणूकपरभणी जिल्ह्यात ५४ जिल्हा परिषद गट व १०८ पंचायत समिती गण यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून, मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकीत गटांसाठी २४७ उमेदवार, तर गणांसाठी ४३३ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक प्रशासनाने सर्व प्रक्रिया पूर्ण करत १,२७८ मतदान केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध केले आहे. मात्र या मनुष्यबळामध्ये जवळपास साडेतीन हजार शिक्षकांची नियुक्ती असल्याने आता मतदानाच्या दिवशीच शिक्षकांची सीटीईटी परीक्षा आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.

निवडणुकीच्या कामातून सूट मिळावी‘शिक्षक पात्रता परीक्षा आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान एकाच दिवशी आल्याने अडचण झाली आहे. एकीकडे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे आणि दुसरीकडे शिक्षक पात्रता परीक्षा देणे यामुळे शिक्षकांची गोची झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना सूट मिळावी, अशी कास्ट्राईब शिक्षक संघटनेची मागणी आहे.सतीश कांबळे, राज्य सरचिटणीस कास्ट्राईब शिक्षक संघटना

English
हिंदी सारांश
Web Title : Election duty and CTET exam clash puts teachers in a fix.

Web Summary : Parbhani teachers face dilemma as election duty and CTET exam coincide. Many seek exemption, straining administration to find replacements and provide training before the February 7th poll.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Teacherशिक्षकparabhaniपरभणी