९३ गावांसाठी ३९५ शिक्षकांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:15 IST2021-04-12T04:15:47+5:302021-04-12T04:15:47+5:30
सेलू तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही रुग्ण गृह अलगीकरणात आहेत; परंतु त्यांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचत ...

९३ गावांसाठी ३९५ शिक्षकांची नियुक्ती
सेलू तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही रुग्ण गृह अलगीकरणात आहेत; परंतु त्यांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचत नाही. शिवाय कोरोना रुग्णाच्या सहवासात येणारे काही जण माहिती लपून कोरोना आजाराचा फैलाव वाढवत आहेत. याबाबत उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी ९ एप्रिल रोजी उपाययोजना करण्यासाठी तहसीलदार बालाजी शेवाळे यांना आदेश दिले होते. या अनुषंगाने तहसीलदार शेवाळे यांनी तालुक्यातील ९३ गावांत लोकसंख्येच्या प्रमाणात ३९५ शिक्षकांची याकामी नियुक्ती केली आहे. १० एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत गृह अलगीकरण रुग्णांची माहिती संकलित करण्यासह त्यांचा शोध घेणे. ही माहिती केंद्र प्रमुख, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सादर करण्याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.