शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूकीसाठी ७ मतदान केंद्राची प्रारुप यादी जाहीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 19:17 IST

विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक संस्था मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ७ मतदान केंद्राची प्रारुप यादी जाहीर केली आहे़

परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक संस्था मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ७ मतदान केंद्राची प्रारुप यादी जाहीर केली आहे़ या यादीवर ३० एप्रिलपर्यंत आक्षेप मागविण्यात आले असून, त्यानंतर अंतिम यादी जाहीर होणार आहे़ 

परभणी-हिंगोली स्थानिक संस्था मतदार संघातून १ प्रतिनिधी विधान परिषदेवर निवडून द्यावयाचा आहे़ यासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्या अंतर्गत मागील आठवड्यात या मतदार संघातील मतदारांची प्रारुप यादी जाहीर करण्यात आली होती़ आता मतदान केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे़ परभणी जिल्ह्यात परभणी, सेलू, गंगाखेड आणि पाथरी तालुक्यात मतदान केंद्र राहणार आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली, कळमनुरी आणि वसमत हे तीन मतदान केंद्र असतील़ परभणी तालुक्यासाठी तहसील कार्यालय परभणी, सेलू व जिंतूर तालुक्यासाठी तहसील कार्यालय सेलू, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांसाठी तहसील कार्यालय गंगाखेड, पाथरी, मानवत, सोनपेठ तालुक्यांसाठी तहसील कार्यालय पाथरी, जिल्हा परिषद हिंगोली, नगर परिषद हिंगोली आणि सेनगाव नगरपंचायतीसाठी तहसील कार्यालय हिंगोली,  कळमनुरी पालिकेसाठी तहसील कार्यालय कळमनुरी आणि वसमत व औंढा नागनाथसाठी तहसील कार्यालय वसमत हे केंद्र निश्चित करण्यात आले आहे़ 

परभणीच्या केंद्रावर सर्वाधिक मतदानस्थानिक संस्था मतदार संघासाठी ५०३ मतदार मतदानाचा हक्क  बजावणार आहेत़ यासाठी परभणी येथे जिल्हा परिषदेचे सदस्य, सर्व पंचायत समितीचे सभापती आणि महानगरपालिकेचे सदस्य अशा १३३ मतदारांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे़ त्याचप्रमाणे हिंगोली येथील मतदान  केंद्रावर हिंगोली जि़प़चे ५७, हिंगोली पालिकेचे ३६ आणि सेनगाव नगरपंचायतीचे १७ असे ११० मतदार मतदानाचा हक्क बजावतील़ सेलूच्या मतदान केंद्रावर नगरपालिका सेलू २८ आणि जिंतूर नगरपालिका २६ असे ५४ मतदार असतील़ गंगाखेड येथील मतदान केंद्रावर गंगाखेड ऩप़ २८, पालम नगरपंचायत १९ आणि  पूर्णा पालिका २३ असे ७० मतदार मतदानाचा हक्क बजावतील़ पाथरी केंद्रावर पाथरी नगरपालिका २३, मानवत नगरपालिका २२, सोनपेठ नगरपालिका २० असे ६५ मतदार, कळमनुरी केंद्रावर कळमनुरी पालिकेतील २० मतदार तर वसमत येथील मतदान केंद्रावर वसमत नगरपालिकेचे ३२ आणि औंढा नगरपंचायतीचे १९ असे ५१ मतदार मतदानाचा हक्क बजावतील़ 

टॅग्स :ElectionनिवडणूकVidhan Parishadविधान परिषदparabhaniपरभणीHingoliहिंगोली