दहा दिवसांत अंतिम आरक्षणाची घोषणा

By Admin | Updated: February 3, 2015 17:06 IST2015-02-03T17:06:18+5:302015-02-03T17:06:18+5:30

आरक्षण आणि प्रभागांची यादी प्रशासनाने तयार केली असून, दहा दिवसांनी त्यास अंतिम मान्यता मिळेल. त्यानंतरच खर्‍या अर्थाने गावपातळीवरील निवडणुकीची दिशा निश्‍चित होईल.

Announcement of final reservation in ten days | दहा दिवसांत अंतिम आरक्षणाची घोषणा

दहा दिवसांत अंतिम आरक्षणाची घोषणा

परभणी : तालुक्याला ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले असून, हळूहळू ग्रामीण भाग तापत आहे. आरक्षण आणि प्रभागांची यादी प्रशासनाने तयार केली असून, दहा दिवसांनी त्यास अंतिम मान्यता मिळेल. त्यानंतरच खर्‍या अर्थाने गावपातळीवरील निवडणुकीची दिशा निश्‍चित होईल. त्यामुळे ग्रामीण भागाला अंतिम आरक्षणाची प्रतीक्षा लागली आहे.
तालुक्यात ८८ ग्रामपंचायतीच्या निवडणूकपूर्व प्रक्रियेला प्रारंभ झाला. दोन दिवसांपूर्वी सर्व ग्रामपंचायतीचे प्रभाग, वॉर्ड व आरक्षण निश्‍चित करण्यात आले. या आरक्षणावर आता आक्षेप मागविले असून, १३ फेब्रुवारी रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. जुलै ते डिसेंबर या काळात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढले. परभणी तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतींची मुदत जुलै महिन्यात तर एका ग्रामपंचायतीची मुदत डिसेंबरमध्ये संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यासाठी तहसील प्रशासन कामाला लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूकपूर्वीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार २८ फेब्रुवारी रोजी प्रत्येक गावात जाऊन तेथील प्रभाग, वॉर्ड रचना आणि आरक्षण निवडले. हे काम पूर्ण झाले असून, प्रभाग व आरक्षणाची यादी तहसील प्रशासनाने प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीत डकविली आहे. जाहीर केलेल्या आरक्षण आणि प्रभाग रचनेवर ५ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप मागविण्यात आले आहेत. तहसीलदारांमार्फत हे आक्षेप दाखल करावयाचे आहेत. ७ फेब्रुवारी रोजी या जिल्हाधिकार्‍यांसमक्ष या आक्षेपांवर सुनावणी घेतली जाणार असून, १३ फेब्रुवारी रोजी अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षणाची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 
मागील संपूर्ण वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनी गाजले. यावर्षी आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. ग्रामीण भागाच्या राजकारणाशी निगडित असलेल्या या निवडणुकांना मोठे महत्त्व असल्याने राजकीय नेते मंडळींचीही या निवडणुकांवर नजर राहणार आहे. /(प्रतिनिधी)

झरी सर्वात मोठी ग्रामपंचायत
मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या यादीत झरी या ग्रामपंचायतीचा समावेश असून, १७ सदस्य असलेली ही ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वात मोठी आहे. त्या खालोखाल दैठणा ग्रामंचायतीत १५ सदस्य संख्या आहे. त्यामुळे या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका तालुक्याचे लक्ष वेधून घेतील. आगामी काळातील निवडणुकांमधून ७३६ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत.

■ आळंद, आलापूर पांढरी, आमडापूर, आंबेटाकळी, आनंदवाडी, अंगलगाव, आर्वी, बलसा खुर्द, भारस्वाडा, भोगाव, बोरवंड खु., बोरवंड बु., ब्राह्मणगाव, ब्रह्मपुरी तर्फे पाथरी, ब्रह्मपुरी तर्फे पेडगाव, डफवाडी, दैठणा, दामपुरी, देवठाणा, धार, धारणगाव, धर्मापुरी, धोंडी, डिग्रस, दुर्डी, एकुरखा तर्फे पेडगाव, गोविंदपूर, हिंगला, इंदेवाडी, इस्माईलपूर, जलालपूर, जांब, जोडपरळी, कैलासवाडी, करडगाव, काष्टगाव, किन्होळा, कोटंबवाडी, कुंभारी, लोहगाव, माळसोन्ना, मांडाखळी, मांडवा, मांगणगाव, मिर्झापूर, मुरुंबा, नागापूर, नांदापूर, नांदगाव बु., नांदगाव खु., नरसापूर, पांढरी, पान्हेरा, परळगव्हाण, पेगरगव्हाण, पिंपळा, पिंपळगाव ठोंबरे, पिंपळगाव टोंग, पिंगळी कोथाळा, पोखर्णी, पोरजवळा, पोरवड, राहाटी, साबा, सहजपूर, समसापूर, संबर, सावंगी खु., शिश्री बु., शिश्री खु., सिंगणापूर, सोन्ना, सूरपिंपरी, ताडलिंबला, ताडपांगरी, टाकळगव्हाण, टाकळी बोबडे, तामसवाडी, तरोडा, ठोळा, उजंबा, उखळद, उमरी, वडगाव सुक्रे, वडगाव तर्फे टाकळी, वांगी, वरपूड, झरी.

Web Title: Announcement of final reservation in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.