शासनाच्या निर्देशांचे पालन करून साजरी होणार जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:16 IST2021-04-14T04:16:01+5:302021-04-14T04:16:01+5:30
परभणी : जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, यावर्षी जयंती मिरवणूक न काढता व शासनाच्या निर्देशांचे पालन करून ...

शासनाच्या निर्देशांचे पालन करून साजरी होणार जयंती
परभणी : जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, यावर्षी जयंती मिरवणूक न काढता व शासनाच्या निर्देशांचे पालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय १३ एप्रिल रोजी सर्व जयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा बैठकीत घेण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती गौतमनगरचे अध्यक्ष आकाश लहाने यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी नवा मोंढा पोलीस ठाण्यात ही बैठक पार पडली. यावेळी सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह सिद्धार्थ हत्तींबिरे, गौतम मुंढे, करण गायकवाड, ज्योती बगाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत जयंती साजरी करणे, मिरवणूक काढणे आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी मार्गदर्शन करताना सिद्धार्थ हत्तींबिरे म्हणाले, कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड, इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक काढणे संयुक्तिक राहणार नाही. शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, महामानवास अभिवादन करावे, असे आवाहन सिद्धार्थ हत्तींबिरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने व प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करून आपापल्या नगरात जयंती उत्सव साजरा करावा, असे आवाहन सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश लहाने यांनी यावेळी केले. तसेच सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी नागेश सोनपसारे, सुशील कांबळे, सुधीर कांबळे, प्रदीप वाव्हळे, अर्जुन पंडित, अविनाश अवचार, अमोल गायकवाड, आशिष वाकोडे, ललित कांबळे, सचिन पाचपुंजे, विश्वजित वाघमारे, उमेश लहाने, सुमीत घागरमाळे, मंचक खंदारे, संजय लहाने, धीरज कांबळे आदींसह जयंती मंडळ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीच्या यशस्वितेसाठी पोलीस निरीक्षक रामेश्वर तट, धुमाळ आदींसह कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.