वर्मा नगरात जयंती सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST2021-04-15T04:16:44+5:302021-04-15T04:16:44+5:30
जयंती समितीचे अध्यक्ष रा. का. साळवे यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ...

वर्मा नगरात जयंती सोहळा
जयंती समितीचे अध्यक्ष रा. का. साळवे यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धुमाळे, विजय रोडे, भगवान काकडे, बाबासाहेब मगरे, भगवान सांडवे, नगरसेवक नागेश सोनपसारे, सुनील सांडवे, उमाकांत अंबोरे, बाबा साळवे, भिकाजी कदम, रुपेश जंगले, प्रवीण कांबळे, ॲड. राजेंद्र ताटे, भगवान गायकवाड, अविनाश बानाटे, राहुल आठवले, प्रकाश मोरे आदींची उपस्थिती होती. यश आकाश खरात या बालकाने याप्रसंगी महाकवि वामनदादा कर्डक यांचे गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. भगवान काकडे यांनी सूत्रसंचालन केले. आशाताई शिंदे यांनी आभार मानले.
कोरोनाच्या नियमांची जनजागृती
परभणी : येथील वीर वारकरी सेवा संघ, नाना पटोले युवा मंच यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाच्या नियमांची जनजागृती करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या उपक्रमाची माहिती देण्यात आली. यावेळी नितीन महाराज गोगलगावकर, किशोर रन्हेर, नितीन रन्हेर, डॉ. सुनील जाधव आदी उपस्थित होते.
सोन्ना जिल्हा परिषद शाळा
परभणी : तालुक्यातील सोन्ना येथील जिल्हा परिषद शाळेत जयंती कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी पुरभा पोंदाळ, रामेश्वर पोंदाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास बळीराम कांबळे, पांडुरंग पोंदाळ, गणेश पोंदाळ, जीवक कांबळे, सतीश पोंदाळ, पुरभाजी बगाटे, बाबासाहेब पंचांगे आदी उपस्थित होते.
सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा
परभणी : येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत जयंती कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्राचार्य सुरेश नाईकवाडे, एम. ए. काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास टी. आर. बोबडे, आर. डी. चव्हाण, मो. अथहर, एस. एल. रेंगे, एम. बी. निर्वळ, एस. एम. शिंदे, एस. टी. गारकर, एम. आर. टोम्पे आदींची उपस्थिती होती.
ठोळा येथे जयंती कार्यक्रम
परभणी : तालुक्यातील ठोळा ग्रामपंचायतीत जयंती कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी सरपंच सुरेखा खोंड, उपसरपंच अमोल देवरे, ग्रामसेवक व्ही. एन. काकडे, चेअरमन रानबा खोंड, खंडू शिंदे, भगवान देवरे, रामभाऊ शिंदे, बाळासाहेब खोंड, मुंजाजी देवरे, चंदन देवरे, हनुमान शिंदे, माजी सरपंच पंढरी देवरे आदींची उपस्थिती होती.
ताडपांगरी येथे अभिवादन
परभणी : तालुक्यातील ताडपांगरी येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. रिपाइंचे प्रदेश सरचिटणीस पंडितराव टोमके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी करण वैरागर, वैजनाथ टोमके, बालासाहेब वैरागर, गुलाब शेख, संतोष टोमके आदी उपस्थित होते.