थंडाव्याच्या शोधात प्राण्यांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST2021-05-01T04:16:06+5:302021-05-01T04:16:06+5:30

परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. शुक्रवारी जिल्ह्याचे तापमान ४० अंशावर गेले होते. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात वाढत्या ...

Animals in search of coolness | थंडाव्याच्या शोधात प्राण्यांची वणवण

थंडाव्याच्या शोधात प्राण्यांची वणवण

परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. शुक्रवारी जिल्ह्याचे तापमान ४० अंशावर गेले होते. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त आहेत. या उष्णतेचा फटका पशुपक्ष्यांसह मुक्या प्राण्यांनाही बसत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ अर्धा टक्का जमिनीवर वनक्षेत्र शिल्लक असल्याने पशु, पक्षी व प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. वनविभागाने पशुपक्षी व प्राण्यांना त्यांच्याच वस्तीमध्ये पाण्याची सोय केल्यास त्यांचे मानवी वस्तीकडे वाढत जाणारे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल, मात्र वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, प्लास्टिकची भांडी उन्हाने वितळल्याने पाणी दूषित होते. म्हणून पक्षी व प्राण्यांसाठी पाण्याने भरलेली मातीची भांडी ठेवण्याचे आवाहन प्राणी मित्र चैतन लांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

Web Title: Animals in search of coolness