संतप्त शेतक-यांनी गंगाखेडमध्ये जिल्हा बँकेचे शटर केले बंद
By Admin | Updated: June 8, 2017 19:34 IST2017-06-08T18:56:47+5:302017-06-08T19:34:55+5:30
बँकेमध्ये दिवसभर थांबूनही पीक विमा किंवा कापूस अनुदानाची खात्यावर जमा असलेली रक्कम मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतक-यांनी

संतप्त शेतक-यांनी गंगाखेडमध्ये जिल्हा बँकेचे शटर केले बंद
>ऑनलाइन लोकमत
गंगाखेड ( जी. परभणी ), दि. 8 - बँकेमध्ये दिवसभर थांबूनही पीक विमा किंवा कापूस अनुदानाची खात्यावर जमा असलेली रक्कम मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतक-यांनी 8 जून रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास येथील जिल्हा बँकेच्या शाखेचे शटर बंद केल्याची घटना घडली.
गंगाखेड शहरात जिल्हा बँकेची शाखा आहे. या शाखेमध्ये तालुकाभरातील विविध ठिकाणच्या शेतकºयांचे बँक खाते आहे. या शेतकºयांच्या बँक खात्यावर पीक विमा, कापसाचे अनुदान आदी पैसे जमा आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून खात्यावर जमा असलेली रक्कम खातेदारक शेतकºयांनाच मिळत नसल्याचा प्रकार घडत आहे. पैसे काढण्यासाठी दलालामार्फत स्लीप भरुन दिल्यास सायंकाळी पैसे मिळत असल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून शेतकरी करीत आहेत. दिवसभर बँकेत थांबूनही पैसे मिळत नसल्याने संतप्त झालेल्या काही शेतक-यांनी ८ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास याबाबतचा जाब बँकेतील अधिकाºयांना विचारला. समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने या शेतकºयांनी बँकेचे शटर बंद करुन तहसील कार्यालय गाठले. तहसीलदार संजय पवार यांची भेट घेऊन त्यांनी आपले गाºहाणे मांडले. तहसीलदार पवार यांनी बँकेतील अधिकाºयांशी चर्चा केली. त्यानंतर बँकेच्या अधिकाºयांनी परभणीहून रक्कम मागविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शटर उघडण्यात आले. तोपर्यंत बँकेच्या आतमध्ये कर्मचारी काम करीत बसले होते. ३.३० वाजेच्या सुमारास परभणीहून कॅश आली. त्यानंतर संबंधित खातेदारांना त्यांच्या विड्रॉल स्लीपप्रमाणे रक्कम देण्यात आली.
दरम्यान, संतप्त शेतकºयांनी बँकेचे शटर बंद केल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.