अंगणवाडीसेविका आज पाळणार काळा दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:19 IST2021-05-27T04:19:23+5:302021-05-27T04:19:23+5:30
परभणी : जिल्ह्यातील आयटक संलग्न युनियनच्या सर्व अंगणवाडीसेविका आणि मदतनीस केंद्र, राज्य सरकारच्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाच्या ...

अंगणवाडीसेविका आज पाळणार काळा दिन
परभणी : जिल्ह्यातील आयटक संलग्न युनियनच्या सर्व अंगणवाडीसेविका आणि मदतनीस केंद्र, राज्य सरकारच्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात २७ मे रोजी काळा निषेध दिन पाळणार आहेत.
सरकारने शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत, श्रम संहिता मागे घ्याव्यात, वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्यावे, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करू नये, राज्याला निधी व लसी लवकर द्याव्यात, या मागण्यांबरोबरच अंगणवाडीसाठी मराठी पोषण ट्रॅकर द्यावे, अंगणवाडीसेविका व मदतनीस यांना विम्याचे संरक्षण द्यावे, तसेच त्यांचा संपर्क ० ते ६ वयोगटांतील मुले, स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांचे सोबत असल्याने, त्यांना कोविडसंबंधी कामाला जुंपू नये, या प्रमुख मागण्यांसाठी काळा दिन पाळून, केंद्र शासनाचा निषेध केला जाणार असल्याचे आयटकच्या वतीने सांगण्यात आले.