अंगलगाव ग्रामपंचायतीची झाली बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST2020-12-31T04:18:08+5:302020-12-31T04:18:08+5:30
परभणी तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे शहरातील कल्याण मंडपम् येथे अर्ज ...

अंगलगाव ग्रामपंचायतीची झाली बिनविरोध निवड
परभणी तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे शहरातील कल्याण मंडपम् येथे अर्ज दाखल करण्यास इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. तालुक्यातील अंगलगाव ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी ७ प्रभागांमधून ज्ञानोबा शिंदे, दुर्गाबाई शिंदे, मंदाकिनी शिंदे, उषा शिंदे, मीना सावळे, देवराव मुळे, लिंबाजी कांबळे या सातच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अन्य एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे ही ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्या गेली आहे. याबाबतच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. या अनुषंगाने आ. सुरेश वरपूडकर, युवक कॉंग्रेसच्या सचिव प्रेरणाताई वरपूडकर यांच्या वतीने या उमेदवारांचा बुधवारी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी या गावासाठी सभामंडप व समाज मंदिरासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी सभापती शिवाजीराव बेले, माणिकराव शिंदे, मुंजाजी शिंदे, सचिन काळे आदींची उपस्थिती होती.