आनंदनगर तांडा ग्रा.पं. ‘प्रहार’च्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:16 IST2021-02-14T04:16:15+5:302021-02-14T04:16:15+5:30

एकूण ७ सदस्य असलेल्या आनंदनगर तांडा ग्रामपंचायत निवडणुकीत युवराज राठोड यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्षाच्या पॅनलने ७ पैकी ५ ...

Anandnagar Tanda G.P. In the possession of ‘Prahar’ | आनंदनगर तांडा ग्रा.पं. ‘प्रहार’च्या ताब्यात

आनंदनगर तांडा ग्रा.पं. ‘प्रहार’च्या ताब्यात

एकूण ७ सदस्य असलेल्या आनंदनगर तांडा ग्रामपंचायत निवडणुकीत युवराज राठोड यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्षाच्या पॅनलने ७ पैकी ५ जागांवर विजय मिळवून निर्विवाद बहुमत सिद्ध केले होते. या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगीताताई पवार तर उपसरपंचपदी अनिल राठोड यांची निवड झाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या हस्ते नवनियुक्त सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तंटामुक्ती अध्यक्ष गोविंद आलू पवार, तालुका प्रमुख नारायण ढगे, पाथरी तालुका प्रमुख युवराज राठोड, परभणी शहर प्रमुख पिंटू कदम, अनिल पवार, बाळू नरवाडे, देविदास पवार, सोमनाथ पवार, बाबूराव पवार, धनसिंग पवार, सूर्यकांत राठोड, दत्ता पवार, भारत पवार, नारायण राठोड, कोंडिराम राठोड आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Web Title: Anandnagar Tanda G.P. In the possession of ‘Prahar’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.