भाजीपाल्यासोबत डाळही सामान्यांच्या आवाक्याबाहेर, हरभरा डाळीने भूक भागविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:17 IST2021-07-26T04:17:30+5:302021-07-26T04:17:30+5:30
डाळींचे दर (प्रति किलो) हरभरा - ६० तुरदाळ - ९० मुगदाळ - ९० उडीद - १०० मसुर - ८० ...

भाजीपाल्यासोबत डाळही सामान्यांच्या आवाक्याबाहेर, हरभरा डाळीने भूक भागविली
डाळींचे दर (प्रति किलो)
हरभरा - ६०
तुरदाळ - ९०
मुगदाळ - ९०
उडीद - १००
मसुर - ८०
भाजीपाल्याचे भाव (प्रति किलो)
पत्ताकोबी - ३०
फुलकोबी - ३०
भेंडी - ३०
शेवगा - ६०
वांगे - ५०
टोमँटो - ४०
गवार - ६०
लिंबू- ४०
दोडके - ६०
मेथी - ६०
पालक - ८०
कोथिंबीर - ८०
काकडी - ३०
कांदा - २५
बटाटे - २५
म्हणून भाजीपाला कडाडला
सध्या टोमँटोचे भाव बाजारात वाझले आहेत. तसेच जास्त पाऊस झाल्यानंतर पालक, मेथी, चुका, कोथिंबीर या पालेभाज्याचे दर वाढतात. तर एरव्ही पाऊस न झाल्यास किंवा कमी पडल्यास फोडभाज्यांचे दर वाढतात. हे गणित भाजीपाला बाजारात नेहमीच सुरु असते. सध्या काही भाज्या स्वस्त तर काही महाग झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
म्हणून डाळ महागली
सध्याच्या बाजारातील डाळींचे भाव या महिन्यात प्रति किलो काही प्रमाणात कमी झाले आहेत. यात मसूर डाळीचा दर वाझलेला आहे. तर बाकी हरभरा, तुरदाळ यांचे दर कमी झाले आहेत. मात्र, फारसा परिणाम भावांमध्ये झालेला नाही. आगामी काळातील सणवार तसेच झालेल्या पावसा्ने डाळींचे उत्पादन कमी झाल्यास पुझील काही महिन्यात हे दर अजून वाढू शकतील.
सर्वसामान्यांचे हाल
दररोज भाजीपाला आवश्यक असतो. मात्र, कोणत्याच भाजीचे दर सध्या कमी नाहीत. यामुळे महिन्याकाठी भाजीसाठी जास्तीचे ५०० रुपये मोजावे लागत आहेत. तर डाळींच्या बाबतही अतिरिक्त पैसे शर्च करावे लागत आहेत. - स्मिता विनोद काळे.
महिन्याकाठी कितीही नियोजन केले तरी सर्वाधिक पैसा भाजीपाला, महिन्याचे रेशन यासह गँस या्च्यावरच खर्च होत आहेत. यामुळे घरचे आर्थिक गणित बिघडले आहे. सणवार लक्षात घेता किमान डाळींचे दर कमी करावेत.