भौतिक सुविधांबरोबरच आरोग्य महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:24 IST2021-06-16T04:24:38+5:302021-06-16T04:24:38+5:30
पाथरी मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना १४ जून रोजी आ.सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते ट्रायसायकलचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. ...

भौतिक सुविधांबरोबरच आरोग्य महत्त्वाचे
पाथरी मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना १४ जून रोजी आ.सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते ट्रायसायकलचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवानराव वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, प्रेरणा वरपुडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आ. वरपुडकर म्हणाले, पाथरी मतदारसंघात आतापर्यंत प्रत्येक गावात आरोग्य शिबिर घेण्यात आले. मोतिबिंदूचे जवळपास अडीच हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. १८०० महिलांच्या गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया झाल्या. मागील वर्षभरापासून कोरोनाच्या संसर्गामुळे ही शिबिरे थांबवावी लागली. कोविडच्या पार्श्वभूमीवर ६३ टक्के दिव्यांगांना ज्यांचे अपंगत्व ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे, अशा अपंगांची तपासणी करून ट्रायसायकल उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ.सुरेश वरपुडकर यांच्या वतीने दिव्यांग बांधवांना ट्रायसायकलचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. एस. नागरगोजे, डॉ. गिरीश साळुंके, मराठवाडा दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल शिवभगत, संजय वाघमारे, माजी सभापती रामभाऊ घाटगे, धोंडीराम चव्हाण, सभागृहनेते माजू लाला, नदीम इनामदार आदींची उपस्थिती होती.