राज्यराणीचे सर्व डब्बे रविवारपासून खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:14 IST2021-07-17T04:14:50+5:302021-07-17T04:14:50+5:30
दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्या हे नांदेड येथे आले असता प्रवासी महासंघाने राज्यराणी एक्स्प्रेसचे नांदेड ते मनमाड, नाशिकपर्यंत ...

राज्यराणीचे सर्व डब्बे रविवारपासून खुले
दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्या हे नांदेड येथे आले असता प्रवासी महासंघाने राज्यराणी एक्स्प्रेसचे नांदेड ते मनमाड, नाशिकपर्यंत बंद अवस्थेत जाणाऱ्या डब्यांचा विरोध दर्शवून, हे सर्व डब्बे सुरू ठेवावेत, अशी मागणी केली होती. त्यानुसार रविवारपासून सर्व डब्बे प्रवाशांसाठी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आदेश रेल्वे विभागाने काढले आहेत. तसेच नांदेड विभागात नवीन तीन पॅसेंजर डेमू रेल्वे सुरू केल्या जाणार आहेत. या रेल्वेत साधारण प्रवासाचे तिकीट स्थानकावर उपलब्ध राहणार आहे. यामध्ये नांदेड-नगरसोल १९ जुलैपासून दुपारी ३ वाजता नांदेड येथून निघणार आहे, तर १९ जुलैपासून पूर्णा-अकोट पूर्णा येथून सकाळी ७ वाजता व २२ जुलैपासून आदिलाबाद-परळी ही रेल्वे आदिलाबाद येथून सकाळी ३.३० वाजता सुटणार आहे. या ३ रेल्वेमुळे सर्वसामान्य प्रवाशांची सोय होणार आहे.