अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:19 IST2021-02-11T04:19:14+5:302021-02-11T04:19:14+5:30
गंगाखेड : तालुक्यातील धारासूर येथे दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सुरु झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता १० फेब्रुवारी रोजी ...

अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
गंगाखेड : तालुक्यातील धारासूर येथे दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सुरु झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता १० फेब्रुवारी रोजी करण्यात आली.
संत गोसावी बुवा समाधी उत्सवानिमित्त धारासूर येथे अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात भागवत कथाकार अर्जुन महाराज शिंदे धारासूरकर यांनी भागवत कथेचे निरुपण केले. कीर्तनकार ह. भ. प. भागवताचार्य बाळू महाराज उखळीकर, भगवान महाराज शेंद्रेकर, गजानन महाराज गोंदीकर, एकनाथ महाराज माने वांगीकर, भागवताचार्य स्वामी शिवेंद्र महाराज यशवाडीकर, कृष्णा महाराज दस्तापूरकर, कृष्णकांत महाराज सताळकर, त्र्यंबक महाराज दस्तापूरकर यांचे कीर्तन झाले. १० फेब्रुवारी रोजी मधुसूदन महाराज दैठणेकर यांच्या काल्याचे कीर्तनानंतर गावात दिंडी सोहळा काढून या सप्ताहाची सांगता करण्यात आली. यावेळी गावातील भजनी मंडळासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.