शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

थ्रोबॉल खेळाडूंना न्याय देण्यासाठी अजितदादांचा पुढाकार, तावडेंचाही सकारात्मक प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 15:06 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राजकारण, समाजकारण यासोबतच खेळालाही खूप महत्त्व देतात.

परभणी - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राजकारण, समाजकारण यासोबतच खेळालाही खूप महत्त्व देतात. शेतीचे प्रश्न जेवढ्या बारकाईने त्यांनी माहीत आहेत तेवढेच बारकाईने त्यांचे खेळ व खेळाडूंच्या प्रगतीकडे असते. थ्रोबॉल खेळाडूंना वैधता प्रमाणपत्र मिळावे जेणेकरून शासकीय नोकरीतील पाच टक्के आरक्षणासाठी ते अर्ज करू शकतील, यासाठी दादांनी थेट क्रीडामंत्री विनोद तावडे यांना फोन लावला. तावडे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. जागच्या जागी फोन लावून आपला विषय थेट मंत्र्यांपर्यंत नेल्यामुळे थ्रोबॉलच्या खेळाडूंनी दादांचे आभार मानले.हल्लाबोल यात्रेच्या सातव्या दिवशी आज अजित पवार परभणी येथे आले असताना गौरव क्रीडा मंडळ, परभणीचे थ्रोबॉल खेळाडूंचे शिष्टमंडळ त्यांना भेटले. विषय होता, १ जुलै २०१६ रोजी शासनाने काढलेल्या एका अजब शासन निर्णयाचा (GR).ऑलम्पिक, एशियन आणि कॉमनवेल्थ खेळाव्यतिरीक्त इतर खेळांना खेळाडूंना वैधता प्रमाणपत्र मिळणार नाही, अशी तरतूद त्यामधे आहे. वैधता प्रमाणपत्र नसेल तर खेळाडू शासकीय नोकरीमध्ये असलेले पाच टक्के आरक्षणासाठी अर्जच करु शकणार नव्हते.आघाडी सरकारच्या काळात २००५ च्या जीआर ४२ खेळांच्या खेळाडूंना शासकीय नोकरीसाठी खेळाडू वैधता प्रमाणपत्र मिळत होते. मात्र १ जुलै २०१६ च्या जीआर नुसार ४२ पैकी फक्त २८ खेळांनाच पात्र करण्यात आले आहे.. वळलेल्या खेळांमध्ये थ्रोबॉलचाही समावेश आहे.आज दादांना भेटलेल्या खेळांडूची अशी मागणी आहे की, शासनाचा जीआरचे आम्ही स्वागतच करतो. मात्र जे खेळाडू २०१६ पूर्वीपासून १० ते १५ वर्षांपासून एकच खेळ खेळत आहे, त्यांच्यावर हा अन्याय आहे. त्यामुळे २०१६ पूर्वीपासून जिल्हा व राज्य स्तरावर जे खेळाडू खेळत आहे, त्यांना खेळाडू वैधता प्रमाणपत्र द्यावे. जेणेकरून शासकीय नोकरीसाठी त्यांना अर्ज करता येईल. दादांनी तात्काळ क्रीडामंत्री विनोद तावडे यांना फोन करुन याबद्दल माहिती दिली. तावडे यांनाही दादांना सकारात्मक प्रतिसाद देत या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारVinod Tawdeविनोद तावडेparabhaniपरभणी