शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अजित दादांनी पाथरीत ऐनवेळी उमेदवार बदलला; आता आमदार राजेश विटेकर रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 14:58 IST

माजी आमदार बाबाजानी यांनी अपक्ष अर्ज भरला असला तरीही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्याची हवा केली होती.

परभणी : जिल्ह्यात चार मतदारसंघांत १६९ उमेदवारांनी २२४ अर्ज दाखल केले आहेत. शेवटच्या दिवशी पाथरी विधानसभेत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून निर्मला विटेकर यांच्याऐवजी आमदार राजेश विटेकर यांना रिंगणात उतरविले आहे.

परभणीत मंगळवारी आमदार राहुल पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करून अर्ज भरला. पाथरीत रासपचे सईद खान यांनी नेते महादेव जानकर यांच्या उपस्थितीत रॅली काढून अर्ज भरला. पाथरीचे आमदार सुरेश वरपूडकर यांनीही सभा घेऊन अर्ज भरला. जिंतूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत सभा घेऊन अर्ज भरला.

दुर्राणींच्या तुतारीची चर्चा हवेतच विरलीमाजी आमदार बाबाजानी यांनी अपक्ष अर्ज भरला असला तरीही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्याची हवा केली होती. मात्र अर्जासोबत काही ए. बी. फॉर्म नव्हता. त्यामुळे उमेदवारीचे फटाके फोडले तरीही ऐनवेळी हा बार फुसका निघाला.

असे आहेत विधानसभानिहाय अर्जपरभणी मतदारसंघात आजपर्यंत एकूण ४६ उमेदवारांनी एकूण ५९ नामनिर्देशन अर्ज दाखल केले. पाथरी विधानसभेत आजपर्यंत ५३ उमेदवारांनी ७७ नामनिर्देशनपत्रे दाखल केली; तर जिंतूरमध्ये आजपर्यंत ४१ उमेदवारांनी ५० अर्ज दाखल केले. गंगाखेड मतदारसंघात २९ उमेदवारांनी ३८ अर्ज दाखल केले आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकpathri-acपाथरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस