दिवाळीनंतर 3 हजार अंगणवाडी सेविका, मदतनिसांना भाऊबीज भेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 03:37 PM2020-11-24T15:37:44+5:302020-11-24T15:40:10+5:30

कोरोनाच्या संकट काळात अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी जिल्ह्यात प्रभावी भूमिका बजावली.

After Diwali, 3,000 Anganwadi workers, helpers and brothers and sisters got gift | दिवाळीनंतर 3 हजार अंगणवाडी सेविका, मदतनिसांना भाऊबीज भेट 

दिवाळीनंतर 3 हजार अंगणवाडी सेविका, मदतनिसांना भाऊबीज भेट 

Next
ठळक मुद्देमहिला व बालकल्याण विभागाकडून ६२ लाख रुपयांचे जिल्ह्यात वितरण 

परभणी : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना प्रत्येकी २ हजार रुपये, या प्रमाणे ६२ लाख ८० हजार रुपयांची भाऊबीज भेट वितरित करण्यात आली आहे. 

कोरोनाच्या संकट काळात अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी जिल्ह्यात प्रभावी भूमिका बजावली. त्यामुळे राज्य शासनाने अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेतला होता. शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाला ६२ लाख ८० हजारांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून सर्व अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये या प्रमाणे निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जवळपास सर्वच अंगणवाडी सेविकांच्या खात्यात निधी जमा झाला आहे. 

ग्रामीण भागात विविध कामे करणाऱ्या अंगणवाडी सेविका शासनाच्या योजना नागरिकांपयर्यंत पोहचविणाऱ्या दुवा ठरत आहेत. बालविकास विभागात बालकांचे पोषण, लसीकरण या कामांमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. या कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने दिवाळी भाऊबीज भेट देण्याचे जाहीर केले. त्यानंतर हा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. दोन दिवसांपासून सर्व अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर निधी जमा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. 

६२ लाख ८० हजार रुपयांचा निधी 
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी २ हजार रुपये या प्रमाणे महिला बालविकास विभागाला ६२ लाख ८० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. अंगणवाडी सेविकांनी कोरोनाच्या संकटकाळात बजावलेली कामगिरी लक्षात घेवून महिला व बालविकास विभागाने निधी प्राप्त होताच तो अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या दोन दिवसांत सर्वांच्या खात्यावर निधी जमा होणार आहे.

प्रोत्साहन मदत
कोरोनाच्या काळात अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे अंगणवाडीताईंना प्रोत्साहन मदत म्हणून हा निधी मिळाला आहे. त्यानुसार अंगणवाडीताईंच्या खात्यावर रक्कम वितरित केली जात आहे. 
- शोभाताई घाटगे, सभापती

भाऊबीज भेट निधी
शासनाकडून प्राप्त झालेला भाऊबीज भेट निधी सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आला आहे. अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर लवकरात लवकर निधी जमा करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.  
- डॉ. कैलास घाेडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. परभणी

Web Title: After Diwali, 3,000 Anganwadi workers, helpers and brothers and sisters got gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.