घरचे साधे पाणी परवडले; पण कोरोनाकाळात जार नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:12 IST2021-05-03T04:12:28+5:302021-05-03T04:12:28+5:30

परभणी शहरात घरोघरी तसेच शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालय, बँक यासह सर्वच ठिकाणी जारचे पाणी मागविले जाते. या ...

Affordable plain water at home; But don't jar in Corona! | घरचे साधे पाणी परवडले; पण कोरोनाकाळात जार नको !

घरचे साधे पाणी परवडले; पण कोरोनाकाळात जार नको !

परभणी शहरात घरोघरी तसेच शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालय, बँक यासह सर्वच ठिकाणी जारचे पाणी मागविले जाते. या व्यवसायाला सध्या लाॅकडाऊनचा आणि कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा फटका बसत आहे. घरी येणाऱ्या प्रत्येक वस्तूची कोरोना काळात काळजी घेतली जात आहे. त्यातच पाणी जारची वाहतूक, स्वच्छ पाणी याकडेही नागरिक लक्ष देत आहेत. यामुळे जारची मागणी कमी झाली आहे. नळाला आणि बोअरला येणारे पाणी पिऊन तहान भागविण्याचा प्रयत्न नागरिक करीत आहेत.

शहरात जार निर्मितीचे प्रकल्प - १०४

मार्च २०१९ मध्ये दररोज होणारी विक्री - ९०००

मार्च २०२० मध्ये दररोज होणारी विक्री - ७२००

मार्च २०२१ मध्ये दररोज होणारी विक्री - ४८००

पालिकेकडे १०४ प्रकल्पांचीच नोंद

शहरात महापालिकेने मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी पाणी जार विक्रीच्या प्लांटचा सर्व्हे केला होता. त्यावेळी काही जार प्लांटला तीन प्रभाग समिती अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तसेच यासह नोंद नसलेल्या प्लांटची संख्याही किमान २०० ते ३०० आहे. काहींवर नोटीस देत तपासणी करून कारवाई केली जाते.

जारचे येणारे पाणी स्वच्छ आहे किंवा नाही, हा प्रश्न कोरोनामुळे मनात येतो. त्यामुळे घरचे बोअरचे पाणी वापरत आहे.

- गिरीष नाईक.

पॅकिंग केलेल्या वस्तूची काळजी वाटत नाही. मात्र, घरोघरी तसेच शहरात सर्वत्र फिरून जार आपल्या घरी आल्यावर सुरक्षित आहे का नाही, याचा प्रश्न निर्माण होते. त्यामुळे नळाचे पाणी वापरतोय.

- अनिल सुकते.

Web Title: Affordable plain water at home; But don't jar in Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.